Doodhi (Bottle Gourd) – Vegetable Rhymes in Marathi

A Doodhi (bottle gourd) is such a refreshing vegetable! It’s full of water with a host of different minerals… Play the video to know more about this fantastic vegetable!

दुधी

 

बाटलीसारखा दिसतो मी

पहा कसा असतो मी

रंगाने हिरवा असतो मी

नाव आहे माझे दुधी

कॅलाबाश दुसरे नाव माझे

आरोग्य राखणे काम माझे

 

वेलींवरती कधी येतो

जमिनीलगतही येतो

कधी गोल गोल असतो

कधी लंबगोल असतो

फुले माझी पांढरी

गर माझा मऊ भारी

 

माझ्यापासून सूप करा

रस माझा  गुणकारी खरा

माझ्या वड्या व हलवा करा

मला खाऊन फस्त करा

चवीला थोडा सोम्य मी

पचनासाठी गुणकारी मी

 

 

 

पोटाचे रोग बरे करतो

उन्हापासून आराम देतो

रोगांना मी घालवतो

चांगले आरोग्य देतो

(Visited 469 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *