fbpx

Hatti (Elephant) – Animal Rhymes in Marathi

Hatti (Elephant) Animal Rhymes & Videos for children to learn about Hatti (Elephant) animal. Watch this lovely rhyme on Hatti (Elephant). This song on elephant is bound to enchant you! Did you know that this keystone species is one of the MOST intelligent and sensitive on planet earth?

हत्ती

मी आहे हत्ती मोठा ताकतवान

सर्व  प्राणी मला घाबरतात

मी जंगली आणि पाळीवही असतो

पटाईत ओंडके वाहण्यात

 

माझ्या राखाडी त्वचेवर तुरळक केस

लांब बळकट माझी सोंड

शेपटी माझी बारीक व लांब

माझे पाय  जणू झाडाचे खोड

 

माझे छोटे इवले डोळे छान

कान माझे मोठे सपाट

टोकदार माझे दोन दोन दात

उपयोगी येतात खोदण्यात

 

माझी सोंड म्हणजे माझे नाक

वास घेते झाडे उखडते

झाडे उपटते, स्वागत करते

अंघोळीची मजा घेते

 

मी खातो कोवळ्या कोवळ्या डहाळ्या

गवत मुळे आणि फळे

माझ्या आवाजाला म्हणतात चित्कारणे

आणि गोंडस माझी बाळे

 

जिथे पाण्याचे  साठे तिथे मी रहातो

माझी तीव्र समरणशक्ती

माझ्या हस्तिदंतासाठी मला

मारू नका तुम्ही

(Visited 1371 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.