Karle (Bitter Gourd) – Vegetable Rhymes in Marathi

A song on Karle (Bitter Gourd)! They’re not as bad as they seem! It’s a vegetable worth developing a taste for. Just look at how much it has to offer you! You’ll never say no to bitter gourd again!

कारले

मी कडू कडू कारले आहे

मी भोपळ्याच्या जातीतला आहे

इतका औषधी मी आहे

की बक्षीसाला पात्र आहे .

लांबोडा मी रंगाने हिरवा

त्वचा माझी खडबडीत पहा

आतमध्ये माझ्या पांढरा मऊ गर

खुसखुशीत बिया असतात बरोबर

मी येतो वेलींवर

लतातंतू असतात बरोबर

नाजूक पिवळी फुले माझी

हिरवी पाने असतात भोवती

मी गुणकारी खूप असतो

ब्लड प्रेशर  शुगर बरोबर ठेवतो

उपयोग माझा कमी करण्या वजन

हृदय व पोटासाठी मी फायदेमंद

जरी असलो मी कडू खूप

रस माझा उपयोगी खूप

भरली कारली लागतात चवदार

कापही असतात लज्जतदार

(Visited 363 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *