Kasava (Tortoise) – Animal Rhymes in Marathi

Kasava (Tortoise) rhyme & Video for children to learn about Kasava (Tortoise). Watch this lovely kids rhyme on Kasava (Tortoise). A slow land reptile… Kasava (Tortoise)! Kasava (Tortoise) are known to have a LONG life span! Watch this rhyme to learn more fun facts about them.

कासव

मी चालतो एकदम सावकाश

गोष्टीमध्ये हरवले सशास

चिडवला जातो मी हळूपणामुळे

सशाला हरवले हुशारीने

 

माझे नाव कासव आहे

टणक कवच माझ्या पाठीवरती आहे

कोणी जेव्हा हल्ला करतो

त्या कवचाच्या आतमध्ये मी शिरतो

 

छोटीशी पण टोकदार शेपटी

जाड पंजे व खवले माझ्यावरती

दात नसतात खातो मी टोकदार तोंडाने

मला आवडते गवत फळे पाने

 

माझे असतात खूप जाती व प्रकार

मी असतो छोटा वा मोठा फार

समुद्री कासव पाण्यात रहातात

बाकी सर्व पाण्याजवळ रहातात

 

रंग माझा राखाडी हिरवा पिवळा तपकिरी

अंडी घालतो बिळात जमिनीच्याखाली

पिल्ले होतात माझी लवकर स्वतंत्र

दीर्घायुष्यासाठी आम्ही प्रसिद्ध

 

(Visited 150 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *