fbpx

Mashroom (Mushroom) – Vegetable Rhymes in Marathi

Mashrooms (Mushrooms) are great source of protein! They have such a delicate umbrella over them! They are used in just about all cuisines!

मशरुम

मी मशरुम वा अळंबी

कोणी म्हणतात कुत्र्याची  छत्री

मी आहे वनस्पती

नाही गरज सूर्यप्रकाशाची

नाही मी गोष्ट मांसाहारी

आहे मी गोष्ट शाकाहारी

आहे मी वनस्पती खरोखर

एकदा मला खाऊन पहा तर

खूप प्रकारात मी येतो

वेगवेगळ्या चवीचा असतो

कधी मी खाण्याला योग्य असतो

कधी मात्र विषारी असतो

ताजे ताजे मला खा

माझे अनेक प्रकार बनवा

मला शिजवा किव्वा तळा

भाजीमध्येही मला घाला

माझ्यात पाणी असते भरपूर

कॅलरीज मात्र कमी खूप

तंतू पोटॅशिअम माझ्यात असती

आणि खनिजे ,व्हिटॅमिन डी व इ

वजन घटवण्या मदत करतो

आणि औषधी सुद्धा असतो

चांगल्या आरोग्यासाठी

उपयोगी मी तुमच्यासाठी

(Visited 320 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.