Simla Mirchi (Capsicum) – Vegetable Rhymes in Marathi
Simla Mirchi (Capsicum) is a veggie that makes you go ‘yum’. It’s also called bell peppers. You know why? It’s shape says it all! Add to your salads and to get that punch!
सिमला मिरची
सिमला मिरची माझे नाव आहे
घंटेसारखा माझा आकार आहे
जन्मले मेक्सिको साऊथ अमेरिकेत
मग मला आणले यूरोप एशिया आफ्रिकेत
माझ्या वासाने ओळखली जाते
मी रंगाने चमकदार असते
केशरी हिरवी लाल वा पिवळी असते
आतमधून मात्र मी पोकळ असते
माझ्या आत छोट्याश्या बिया असतात
माझे अनेक पदार्थ बनवतात
पिझ्झा पास्त्यामध्ये मला घालतात
माझ्यापासून छान सलाड बनवतात
व्हिटॅमिन सी असते माझ्यामध्ये
खनिजे व्हिटॅमिन्स असतात माझ्यामध्ये
मला शिजवा किव्वा मला तळा
पण आवडीने माझे सेवन करा
(Visited 402 times, 1 visits today)