Vatana (Peas) – Vegetable Rhymes in Marathi

These vatana (peas) rest in pods and they are rich in protein! This vegetable rhyme on vatana (peas) tells you everything you need to know about it!

वाटाणा

मी आहे गोल गोल हिरवा टपोरा

मला म्हणतात वाटाणा

मी शेंगेमधे येतो ,वेलींवर लागतो

एका ओळींमध्ये नीट बसतो

जेव्हा ताजा असतो ,खाण्याला तयार असतो

तेव्हा मी मस्त गोड़ लागतो

मी येतो थंडीमध्ये ,जर ठेवले फ्रीजमध्ये

मला बारा महिने खाता येते

माझ्या करंज्या पोहे पुलाव आणि सामोसे

पहा असतात चवदार कसे

माझे सूप आणि सलाड ,परोठे लज्जतदार

खाऊन मज्जा येते फार

मला सुकवले जाते आणि सोलले जाते

डाळ म्हणून साठवले जाते

तंतू प्रोटीन व्हिटॅमिन खनिजांनी मी युक्त

पर्यावरणासाठीही उपयुक्त

माझ्यावरून आहे एक इंग्लिश म्हण

जिचा आशय फार सुंदर

अनेक प्रकारांनी माझा करावा वापर

चव न्यारी माझी खरोखर

(Visited 515 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *